भजनी मालिका
← भजनांकडे परत

आता न यें मागें । मी आलें याच्या रागें । काय माझें जगें । कोपोनियां करावें

ata na yen magen | mi alen yachya ragen | kay majhen jagen | koponiyan karaven

रचनाकार: संत तुकाराम · अभंग
आता न यें मागें । मी आलें याच्या रागें । काय माझें जगें । कोपोनियां करावें ॥१॥ कां गो कलित्यां कोल्हाळा । तुम्ही भलत्या च सकळा । वेचाला ते बोला । झुटे होती बोलिले ॥ध्रु.॥ याचे भेटी माझें मन । स्वरुपीं ठाकले लोचन । वेगळें तें क्षण आतां होऊं नावरे ॥२॥ काज काम नको झालें । बीजें नावरे बोलिलें । याचिया भेदिलें । कामबाणीं अंतर ॥३॥ या वेगळें होणें । आतां जळो तैसें जिणें । घेतलें तें मनें । आतां मागें न फिरे ॥४॥ आतां मोटी वार । माझी नका धरूं चार । सवे तुकयाचा दातार । शेजे तो मी सुतलों ॥५॥