भजनी मालिका
← भजनांकडे परत

असोत हे तुझे प्रकार सकळ । काय खळखळ करावी हे

asot he tujhe prakar sakal | kay khalakhal karavi he

रचनाकार: संत तुकाराम · अभंग
असोत हे तुझे प्रकार सकळ । काय खळखळ करावी हे ॥१॥ आमुचें स्वहित जाणतसों आम्ही । तुझें वर्म नामीं आहे तुझ्या ॥ध्रु.॥ विचारितां आयुष्य जातें वांयांविण । रोज नागवन पडतसे ॥२॥ राहेन मी तुझे पाय आठवूनी । आणीक तें मनीं येऊं नेदीं ॥३॥ तुका म्हणे येथें येसी अनायासें । थोर तुज पिसें कीर्तनाचें ॥४॥