भजनी मालिका
← भजनांकडे परत

असोनि न कीजे अलिप्त अहंकारें । उगी च या भारें कुंथाकुंथी

asoni na kije alipta ahankaren | ugi cha ya bharen kunthakunthi

रचनाकार: संत तुकाराम · अभंग
असोनि न कीजे अलिप्त अहंकारें । उगी च या भारें कुंथाकुंथी ॥१॥ धांवा सोडवणें वेगीं लवकरी । मी तों जालों हरी शक्तीहीन ॥ध्रु.॥ भ्रमल्यानें दिसें बांधल्याचेपरी । माझें मजवरी वाहोनियां ॥२॥ तुका म्हणे धांव घेतलीसे सोई । आतां पुढें येई लवकरी ॥३॥