भजनी मालिका
← भजनांकडे परत

असो मागे जाले । पुढे गोड ते चांगले

aso mage jale | pudhe god te changale

रचनाकार: संत तुकाराम · अभंग
असो मागे जाले । पुढे गोड ते चांगले ॥१॥ आतां माझे मनी । काहीं अपराध न मनी ॥ध्रु.॥ नेदी अवसान । करी नामचें चिंतन ॥२॥ तुका म्हणे बोले । तुज आधीच गोविलें ॥३॥