भजनी मालिका
← भजनांकडे परत

असो खळ ऐसे फार । आम्हां त्यांचे उपकार

aso khal aise phar | amhan tyanche upakar

रचनाकार: संत तुकाराम · अभंग
असो खळ ऐसे फार । आम्हां त्यांचे उपकार ॥१॥ करिती पातकांची धुनी । मोल न घेतां साबनीं ॥ध्रु.॥ फुकाचे मजुर। ओझें वागविती भार ॥२॥ पार उतरुन म्हणे तुका । आम्हां आपण जाती नरका ॥३॥