भजनी मालिका
← भजनांकडे परत

असो आतां किती । तुज यावें काकुलती

aso atan kiti | tuj yaven kakulati

रचनाकार: संत तुकाराम · अभंग
असो आतां किती । तुज यावें काकुलती ॥१॥ माझें प्रारब्ध हें गाढें । तूं बापुडें तयापुढें ॥ध्रु.॥ सोडवीन आतां । ब्रीदें तुझीं पंढरीनाथा ॥२॥ तुका म्हणे बळी । तो गांढयाचे कान पिळी ॥३॥