भजनी मालिका
← भजनांकडे परत

आशीर्वाद तया जाती । आवडी चित्तीं देवाची

ashirvad taya jati | avadi chittin devachi

रचनाकार: संत तुकाराम · अभंग
आशीर्वाद तया जाती । आवडी चित्तीं देवाची ॥१॥ कल्याण ती असो क्षेम । वाढे प्रेम आगळें ॥ध्रु.॥ भक्तिभाग्यगांठी धन । त्या नमन जीवासी ॥२॥ तुका म्हणे हरीचे दास । तेथें आस सकळ ॥३॥