भजनी मालिका
← भजनांकडे परत

आशाबद्ध वक्ता । धाक श्रोतयाच्या चित्ता

ashabaddha vakta | dhak shrotayachya chitta

रचनाकार: संत तुकाराम · अभंग
आशाबद्ध वक्ता । धाक श्रोतयाच्या चित्ता ॥१॥ गातो तेची नाही ठावे । तोंड वासी कही द्यावे ॥ध्रु .॥ जाले लोभाचे मांजर । पोट धरी दारोदार ॥२॥ वांयां गेलें तें भजन । उभयतां लोभी मन ॥३॥ बहिर्मुख एके ठायीं । तैसें जालें तया दोहीं ॥४॥ माप तैसी गोणी । तुका म्हणे रितीं दोन्ही ॥५॥