भजनी मालिका
← भजनांकडे परत

आशा हे समूळ खाणोनि काढावी । तेव्हांचि गोसावी व्हावें तेणें

asha he samul khanoni kadhavi | tevhanchi gosavi vhaven tenen

रचनाकार: संत तुकाराम · अभंग
आशा हे समूळ खाणोनि काढावी । तेव्हांचि गोसावी व्हावें तेणें ॥१॥ नाहीं तरी सुखें असावें संसारीं । फजिती दुसरी करूं नये ॥ध्रु.॥ आशा मारूनिया जयवंत व्हावें । तेव्हांचि निघावें सर्वांतूनि ॥२॥ तुका म्हणे जरीं योगाची तांतडी । आशेची बीबुडी करीं आधीं ॥३॥