भजनी मालिका
← भजनांकडे परत

असार घेईजे सार परखुनियां विचार

asar gheije sar parakhuniyan vichar

असार घेईजे सार परखुनियां विचार । जेणें तुटे येरझार मरणजन्मीं ॥१॥ तें रुपस रुपडे पहा न संपडे । ह्रदयीं सांपडे ज्ञान गोष्टी ॥२॥ सांगता अनुमान अद्वैत सार पूर्ण । ज्ञानाज्ञानीं सज्ञान विरुळा जाणे ॥३॥ ज्ञानदेव सोपान सांगितलिया संपन्न । हरितत्त्व अनुप्रमाण लाधे पूर्वपुण्यें ॥४॥