भजनी मालिका
← भजनांकडे परत

अरे अरे ज्ञाना ज्ञान हे निवृत्ति

are are dnyana dnyan he nivrutti

अरे अरे ज्ञाना ज्ञान हे निवृत्ति । देहीं देहा उपरती तुज प्राप्त ॥१॥ अर्थावबोध अर्थुनि दाविला । ज्ञानियां तूं भला ज्ञानदेवा ॥२॥ सोहं तत्त्वसाधनें प्रमाण सर्वत्रीं । उभयतां गात्रीं प्रेम तनू ॥३॥ बिंबी बिंबरसीं उपरम देखिला । प्रपंच शोखिला तुवां एकें ॥४॥ विष्णुनाम मंत्र सोहं तेज दिवटा । उजळून चोहटा शुध्द केला ॥५॥ निवृत्तीचा शिष्य ज्ञानदेवीं भावी । शांति समरस बोध उतरे ॥६॥