भजनी मालिका
← भजनांकडे परत

आपुल्या विचार करीन जीवाशीं । काय या जनाशीं चाड मज

apulya vichar karin jivashin | kay ya janashin chad maj

रचनाकार: संत तुकाराम · अभंग
आपुल्या विचार करीन जीवाशीं । काय या जनाशीं चाड मज ॥१॥ आपुलें स्वहित जाणती सकळ । निरोधितां बळें दुःख वाटे ॥ध्रु.॥ आइको नाइको कथा कोणी तरी । जाऊनियां घरीं निजो सुखें ॥२॥ माझी कोण वोज जाला हा शेवट । देखोनियां वाट आणिकां लागे ॥३॥ तुका म्हणे भाकुं आपुली करुणा । जयाची वासना तथा फळे ॥४॥