भजनी मालिका
← भजनांकडे परत

आपुल्या स्वहिता वाचेसी उच्चारा । आळस न करा क्षणभरी

apulya svahita vachesi uchchara | alas na kara kshanabhari

रचनाकार: संत चोखोबा · अभंग
आपुल्या स्वहिता वाचेसी उच्चारा । आळस न करा क्षणभरी ॥१॥ जाईल हा देह वाउगाचि उगा । अभ्रांची छाया जयापरी ॥२॥ असारा साराचे नक पडूं भरी । सार तेंचि धरी हरिनाम ॥३॥ चोखा म्हणे नाम हाचि मंत्र सुगम । नको आन श्रम जाय वांया ॥४॥