भजनी मालिका
← भजनांकडे परत

आपुलिये ठाकीं । करीन कांहीं तरी एकी

apuliye thakin | karin kanhin tari eki

रचनाकार: संत तुकाराम · अभंग
आपुलिये ठाकीं । करीन कांहीं तरी एकी ॥१॥ करीन पायांसी वोळखी । करिसी तें करीं सुखीं ॥ध्रु.॥ कायाक्लेशगंगाजळ । समर्पीन तुळसीदळ ॥२॥ तुका म्हणे देवा । कर जोडीन ते सेवा ॥३॥