भजनी मालिका
← भजनांकडे परत

आपुलिया सुखा आपणचि आला । उगलाचि ठेला विटेवरी

apuliya sukha apanachi ala | ugalachi thela vitevari

रचनाकार: संत चोखोबा · अभंग
आपुलिया सुखा आपणचि आला । उगलाचि ठेला विटेवरी ॥१॥ तें हें सगुण रूप चतुर्भुज मूर्ति । शंख चक्र हातीं गदा पद्म ॥२॥ किरीट कुंडलें वैजयंती माळा । कांसे सोनसळा तेज फाके ॥३॥ चोखा म्हणे सर्व सुखाचें आगर । रूप मनोहर गोजिरें तें ॥४॥