भजनी मालिका
← भजनांकडे परत

आपुलिया काजा । आह्मीं सांडियेलें लाजा

apuliya kaja | ahmin sandiyelen laja

रचनाकार: संत तुकाराम · अभंग
आपुलिया काजा । आह्मीं सांडियेलें लाजा ॥१॥ तुम्हां असों जागवीत । आपुलें आपुले हित ॥ध्रु.॥ तुम्ही देहशून्य । आम्हां कळे पाप पुण्य ॥२॥ सांगायासी लोकां । उरउरीत उरला तुका ॥३॥