भजनी मालिका
← भजनांकडे परत

आपुलिया आंगें तोडी मायाजाळ । ऐसें नाहीं बळ कोणापाशीं

apuliya angen todi mayajal | aisen nahin bal konapashin

रचनाकार: संत तुकाराम · अभंग
आपुलिया आंगें तोडी मायाजाळ । ऐसें नाहीं बळ कोणापाशीं ॥१॥ रांडापोरें त्याग करी कुटुंबाचा । नावरे हे वाचा आणि मन ॥ध्रु.॥ हर्षामर्ष जों हे नाहीं जों जिराले । तोंवरी हे केले चार त्यांनीं ॥२॥ मुक्त जालों ऐसें बोलों जाये मुखें । तुका म्हणे दुःखें बांधला तो ॥३॥