भजनी मालिका
← भजनांकडे परत

आपुलें वेचूनि खोडा घाली पाव । ऐसे जया भाव हीनबुद्धी तो

apulen vechuni khoda ghali pav | aise jaya bhav hinabuddhi to

रचनाकार: संत तुकाराम · अभंग
आपुलें वेचूनि खोडा घाली पाव । ऐसे जया भाव हीनबुद्धी तो ॥१॥ विषयांच्या संगें आयुष्याचा नास । पडियेलें ओस स्वहितांचे ॥ध्रु.॥ भुलल्यांचें अंग आपणा पारिखें । छंदा च सारिखें वर्ततसे ॥२॥ तुका म्हणे दुःख उमटे परिणामीं । लंपटासी कामीं रतलिया ॥३॥