भजनी मालिका
← भजनांकडे परत

आपुलें तों कांहीं । येथें सांगिजेसें नाहीं

apulen ton kanhin | yethen sangijesen nahin

रचनाकार: संत तुकाराम · अभंग
आपुलें तों कांहीं । येथें सांगिजेसें नाहीं ॥१॥ परि हे वाणी वायचळ । छंद करविते बरळ ॥ध्रु.॥ पंचभूतांचा हा मेळा । देह सत्यत्वें निराळा ॥२॥ तुका म्हणे भुली । इच्या उफराटया चाली ॥३॥