भजनी मालिका
← भजनांकडे परत

आपुलें मागतां । काय नाहीं आम्हां सत्ता

apulen magatan | kay nahin amhan satta

रचनाकार: संत तुकाराम · अभंग
आपुलें मागतां । काय नाहीं आम्हां सत्ता ॥१॥ परि या लौकिकाकारणें । उरीं ठेविली बोलणें ॥ध्रु.॥ ये चि आतां घडी । करूं बैसों ते ची फडी ॥२॥ तुका म्हणे करितों तुला । ठाव नाहींसें विठ्ठला ॥३॥