भजनी मालिका
← भजनांकडे परत

आपुलें आपण जाणावें स्वहित । जेणें राहे चित्त समाधान

apulen apan janaven svahit | jenen rahe chitta samadhan

रचनाकार: संत तुकाराम · अभंग
आपुलें आपण जाणावें स्वहित । जेणें राहे चित्त समाधान ॥१॥ बहुरंगें माया असे विखुरली । कुंठिंत चि जाली होतां बरी ॥ध्रु.॥ पूजा ते अबोला चित्ताच्या प्रकारीं । भाव विश्वंभरीं समर्पावा ॥२॥ तुका म्हणे गेला फिटोनियां भेद । मग होतो देव मनाचा चि ॥३॥