भजनी मालिका
← भजनांकडे परत

आपुलाला लाहो करूं । केणें भरूं हा विठ्ठल

apulala laho karun | kenen bharun ha viththal

रचनाकार: संत तुकाराम · अभंग
आपुलाला लाहो करूं । केणें भरूं हा विठ्ठल ॥१॥ भाग्य पावलों या ठाया । आतां काया कुरवंडी ॥ध्रु.॥ पुढती कोठें घडे ऐसें । बहुतां दिसें फावलें ॥२॥ तुका म्हणे जाली जोडी । चरण घडी न विसंभें ॥३॥