भजनी मालिका
← भजनांकडे परत

आपणा लागे काम वाण्याघरीं गुळ । त्याचे याति कुळ काय कीजे

apana lage kam vanyagharin gul | tyache yati kul kay kije

रचनाकार: संत तुकाराम · अभंग
आपणा लागे काम वाण्याघरीं गुळ । त्याचे याति कुळ काय कीजे ॥१॥ उकरड्यावरी वाढली तुळसी । टाकावी ते कैसी ठायागुणें ॥ध्रु.॥ गाईंचा जो भक्ष अमंगळ खाय । तीचें दूध काय सेवूं नये ॥२॥ तुका म्हणे काय सलपटासी काज । फणसांतील बीज काढुनि घ्यावें ॥३॥