भजनी मालिका
← भजनांकडे परत

आपण तों असा । समर्थ जी हृषीकेशा

apan ton asa | samartha ji hrushikesha

रचनाकार: संत तुकाराम · अभंग
आपण तों असा । समर्थ जी हृषीकेशा ॥१॥ करा करा बुझावणी । काय विलंब वचनीं ॥ध्रु.॥ हेंगे ऐसें म्हणा । उठूनि लागेन चरणा ॥२॥ घेऊनियां सुखें । नाचेल तुका कवतुकें ॥३॥