भजनी मालिका
← भजनांकडे परत

अणुरेणुयां थोकडा । तुका आकाशाएवढा

anurenuyan thokada | tuka akashaevadha

रचनाकार: संत तुकाराम · अभंग
अणुरेणुयां थोकडा । तुका आकाशाएवढा ॥१॥ गिळुनि सांडिलें कलेवर । भव भ्रमाचा आकार ॥ध्रु.॥ सांडिली त्रिपुटी । दीप उजळला घटीं ॥२॥ तुका म्हणे आतां । उरलों उपकारापुरता ॥३॥