भजनी मालिका
← भजनांकडे परत

आनुहातीं गुंतला नेणे बाह्य रंग । वृत्ति येतां मग बळ लागे

anuhatin guntala nene bahya rang | vrutti yetan mag bal lage

रचनाकार: संत तुकाराम · अभंग
आनुहातीं गुंतला नेणे बाह्य रंग । वृत्ति येतां मग बळ लागे ॥१॥ मदें माते तया नाहीं देहभाव । आपुले अवयव आवरीतां ॥ध्रु.॥ आणिकांची वाणी वेद तेणें मुखें । उपचारदुःखें नाठवती ॥२॥ तें सुख बोलतां आश्चर्य या जना । विपरीत मना भासतसे ॥३॥ तुका म्हणे बाह्य रंग जो विटला । अंतर निवालें ब्रम्हरसें ॥४॥