भजनी मालिका
← भजनांकडे परत

अंतरली खुटी मेटी । भय धरूनियां पोटीं । म्हणतां जगजेठी । धांवें करुणाउत्तरीं

antarali khuti meti | bhay dharuniyan potin | mhanatan jagajethi | dhanven karunauttarin

रचनाकार: संत तुकाराम · अभंग
अंतरली खुटी मेटी । भय धरूनियां पोटीं । म्हणतां जगजेठी । धांवें करुणाउत्तरीं ॥१॥ बाप बळिया शिरोमणी । उतावळि या वचनीं । पडलिया कानीं । धांवा न करी आळस ॥ध्रु.॥ बळ दुनी शरणागता । स्वामी वाहों नेदी चिंता । आइतें चि दाता । पंगतीस बैसवी ॥२॥ वाहे खांदीं पाववी घरा । त्याच्या करी येरझारा । बोबड्या उत्तरा । स्वामी तुकया मानवे ॥३॥ सारविलें निकें । वरी माजी अवघें फिकें ॥४॥ तुका ह्मणे अंतीं । कांहीं न लगे चि हातीं ॥५॥