भजनी मालिका
← भजनांकडे परत

आणितां त्या गती । हंस काउळे न होती

anitan tya gati | hans kaule na hoti

रचनाकार: संत तुकाराम · अभंग
आणितां त्या गती । हंस काउळे न होती ॥१॥ सांडा सांडा रे मठारे । येथें गांठीसवें धुरें ॥ध्रु.॥ नाकेंविण मोती । उभ्या बाजारें फजिती ॥२॥ हुकुमदाज तुका । येथें कोणी फोंदो नका ॥३॥