भजनी मालिका
← भजनांकडे परत

आणिकांच्या कापिती माना । निष्ठुर पार नाहीं

anikanchya kapiti mana | nishthur par nahin

रचनाकार: संत तुकाराम · अभंग
आणिकांच्या कापिती माना । निष्ठुर पार नाहीं ॥१॥ करिती बेटे उसणवारी । यमपुरी भोगावया ॥ध्रु.॥ सेंदराचें दैवत केलें । नवस बोले तयासि ॥२॥ तुका म्हणे नाचति पोरें । खोडितां येरें अंग दुखे ॥३॥