भजनी मालिका
← भजनांकडे परत

आणिकां छळावया जालासी शाहाणा । स्वहिता घातले खानें । आडिके पैके करूनि सायास

anikan chhalavaya jalasi shahana | svahita ghatale khanen | adike paike karuni sayas

रचनाकार: संत तुकाराम · अभंग
आणिकां छळावया जालासी शाहाणा । स्वहिता घातले खानें । आडिके पैके करूनि सायास । कृपणें सांचलें धन । न जिरे क्षीर श्वानासी भिक्षतां । याती तयाचा गुण । तारुण्यदशे अधम मातला । दवडी हात पाय कान ॥१॥ काय जालें यांस वांयां कां ठकले । हातीं सांपडलें टाकीतसे । घेउनि स्फटिकमणी टाकी चिंतामणी । नागवले आपुले इच्छे ॥ध्रु.॥ सिद्धीं सेविलें सेविती अधम । पात्रासारिखे फळ । सिंपिली मोतीं जन्मलें स्वातीचे । वरुषलें सर्वत्र जळ । कापुस पट नये चि कारणा । तयास पातला काळ । तें चि भुजंगें धरिलें कंठीं । मा विष जालें त्याची गरळ ॥२॥ भिक्षूनि मिष्टान्न घृतसाकर । सहित सोलुनि केळें । घालुनियां घसां अंगोळिया । हाते वांत करू बळें । कुंथावयाची आवडी ओवा । उन्हवणी रडवी बाळें । तुका म्हणे जे जैसें करिती । ते पवती तैसीं च फळें ॥३॥