भजनी मालिका
← भजनांकडे परत

अंगें अनुभव जाला मज । संतरजचरणांचा

angen anubhav jala maj | santarajacharanancha

रचनाकार: संत तुकाराम · अभंग
अंगें अनुभव जाला मज । संतरजचरणांचा ॥१॥ सुखी जालों या सेवनें । दुःख नेणें यावरी ॥ध्रु.॥ निर्माल्याचें तुळसीदळ । विष्णुजळ चरणींचें ॥२॥ तुका म्हणे भावसार । करूनि फार मिश्रित ॥३॥