भजनी मालिका
← भजनांकडे परत

अनेक दोषांचे काट । जे जे गादले निघोंट । होती हरीनामें चोखट । क्षण एक न लगतां

anek doshanche kat | je je gadale nighont | hoti harinamen chokhat | kshan ek na lagatan

रचनाकार: संत तुकाराम · अभंग
अनेक दोषांचे काट । जे जे गादले निघोंट । होती हरीनामें चोखट । क्षण एक न लगतां ॥१॥ तुम्ही हरी म्हणा हरी म्हणा । महादोषांचे छेदना ॥ध्रु.॥ अतिप्रीतीचा बांधला । नष्ट चांडाळीं रतला । क्षण न लगतां नेला । वैकुंठासी हरी म्हणतां ॥२॥ अमित दोषाचें मूळ । झालें वाल्मीकासी सबळ । झाला हरीनामें निर्मळ । गंगाजळ पैं जैसा ॥३॥ हरी म्हणतां तरले । महादोषी उद्धरिले । पहा गणिकेसी नेलें । वैकुंठासी हरी म्हणतां ॥४॥ हरीविण जन्म नको वांयां । जैसी दर्पणींची छाया । म्हणोनि तुका लागे पायां । शरण तया हरीसी ॥५॥