भजनी मालिका
← भजनांकडे परत

आंधळ्यासि जन अवघे चि आंधळे । आपणासि डोळे दृष्टी नाहीं

andhalyasi jan avaghe chi andhale | apanasi dole drushti nahin

रचनाकार: संत तुकाराम · अभंग
आंधळ्यासि जन अवघे चि आंधळे । आपणासि डोळे दृष्टी नाहीं ॥१॥ रोग्या विषतुल्य लागे हें मिष्टान्न । तोंडासि कारण चवी नाहीं ॥२॥ तुका म्हणे शुद्ध नाहीं जो आपण । तया त्रिभुवन सर्व खोटें ॥३॥