भजनी मालिका
← भजनांकडे परत

अनंतीं अनंत तत्त्वता तंव एक

anantin anant tattvata tanv ek

अनंतीं अनंत तत्त्वता तंव एक । विरुळा जाणे एक बिंबताहे ॥१॥ एका तेजी बहु बहुतेज घृष्टी । एकतत्त्व सृष्टी मेळु शिवीं ॥२॥ तर्काचाही तर्क विवेक सकळ । तेणेंविण गोपाळ आकळेना ॥३॥ ज्ञानदेव म्हणे जाणे प्रसाद निवृत्ति । मौनाची मुक्ति वाट आहे ॥४॥