भजनी मालिका
← भजनांकडे परत

अनंत ब्रम्हांडें । एके रोमीं ऐसें धेंडें

anant bramhanden | eke romin aisen dhenden

रचनाकार: संत तुकाराम · अभंग
अनंत ब्रम्हांडें । एके रोमीं ऐसें धेंडें ॥१॥ तो या गौळियांचे घरीं । उंबरा चढतां टेंका धरी ॥ध्रु.॥ मारीले दैत्य गाडे । ज्यांचे पुराणीं पवाडे ॥२॥ तुका म्हणे कळा । अंगीं जयाच्या सकळा ॥३॥