भजनी मालिका
← भजनांकडे परत

आनंदाच्या ताटीं अमृताची वाटी । विवेकतारुं घोटी रसनाबळें

anandachya tatin amrutachi vati | vivekatarun ghoti rasanabalen

आनंदाच्या ताटीं अमृताची वाटी । विवेकतारुं घोटी रसनाबळें ॥१॥ तें हें रुपडें रुपस विठ्ठल । पुंडलिकें बहु साल प्रार्थियलें ॥ध्रु०॥ तारावया जन व्हावया पावन । जड मूढ अज्ञान हरीपाठें ॥२॥ कर्म धर्म करितां शिणली येतां जातां । मग पुंडलिकें अनंता प्रर्थियलें ॥३॥ येउनिया श्रीहरी भीमेच्या तीरीं । सुदर्शनावरी पंढरी उभाविली ॥४॥ अमरतरुवर तीर्थ सरोवर । वेणुनादीं श्रीधर खेळताती ॥५॥ बागडे गाती हरि वाकुल्या कुसरी । तेथें पुंडलिक परोपरी स्तवन करी ॥६॥ धन्य पंढरीनगरी फ़ावली चराचरीं । धन्य जो भूमीवरी दृष्टीभरी हरी देखे ॥७॥ ज्ञानदेवा बीज विठ्ठल केशीराज । नव्हे ते नवल चोज प्रत्यक्ष हरी ॥८॥