भजनी मालिका
← भजनांकडे परत

आनंदाच्या कोटी । सांठवल्या आह्मां पोटीं

anandachya koti | santhavalya ahman potin

रचनाकार: संत तुकाराम · अभंग
आनंदाच्या कोटी । सांठवल्या आह्मां पोटीं ॥१॥ प्रेम चालिला प्रवाहो । नामओघ लवलाहो ॥ध्रु.॥ अखंड खंडेना जीवन । राम कृष्ण नारायण ॥२॥ घडी अहक्य परत्र । तुका ह्मणे समतीर ॥३॥