भजनी मालिका
← भजनांकडे परत

आनंद अद्वय नित्य निरामय । जे कां निजध्येय योगियांचे

anand advay nitya niramay | je kan nijadhyey yogiyanche

रचनाकार: संत तुकाराम · अभंग
आनंद अद्वय नित्य निरामय । जे कां निजध्येय योगियांचे ॥१॥ ते हे समचरण साजिरे विटेवरी । पहा भीमा तिरी विठ्ठलरुप ॥धृ॥ पुराणासी वाड श्रुती नेंणती पार । ते झाले साकार पुंडलिका ॥२॥ तुका म्हणे ज्याते सनकादिक ध्यात । ते आमुचे कुळ दैवत पांडुरंग ॥३॥