भजनी मालिका
← भजनांकडे परत

आमुची मिरासी पंढरी । आमुचें घर भीमातिरीं

amuchi mirasi pandhari | amuchen ghar bhimatirin

रचनाकार: संत तुकाराम · अभंग
आमुची मिरासी पंढरी । आमुचें घर भीमातिरीं ॥१॥ पांडुरंग आमुचा पिता । रकुमाबाईं आमुचि माता ॥ध्रु.॥ भाव पुंडलीक मुनि । चंद्रभागा आमुची बहिणी ॥२॥ तुका जुन्हाट मिराशी । ठाव दिला पायांपाशीं ॥३॥