भजनी मालिका
← भजनांकडे परत

आमुचें उचित हे चि उपकार । आपला चि भार घालूं तुज

amuchen uchit he chi upakar | apala chi bhar ghalun tuj

रचनाकार: संत तुकाराम · अभंग
आमुचें उचित हे चि उपकार । आपला चि भार घालूं तुज ॥१॥ भूक लागलिया भोजनाची आळी । पांघुरणें काळीं शीताचिये ॥ध्रु.॥ जेणें काळें उठी मनाची आवडी । ते चि मागों घडी आवडे तें ॥२॥ दुःख येऊं नेदी आमचिया घरा । चक्र करी फेरा भोंवताला ॥३॥ तुका म्हणे नाहीं मुक्तीसवें चाड । हें चि आम्हां गोड जन्म घेतां ॥४॥