भजनी मालिका
← भजनांकडे परत

आमुचें संचित जैसें जैसें आहे । तेथें तो उपाय न चले कांही

amuchen sanchit jaisen jaisen ahe | tethen to upay na chale kanhi

रचनाकार: संत चोखोबा · अभंग
आमुचें संचित जैसें जैसें आहे । तेथें तो उपाय न चले कांही ॥१॥ सुखें आठवीन तुमचें हें नाम । न होय तेणें श्रम जीवा कांही ॥२॥ कासया करूं जिवासी आटणी । नाम निर्वाणी तारीतसे ॥३॥ मागेही तरले पुढेंही तरती । चोखा म्हणे चित्तीं दृढ वसो ॥४॥