भजनी मालिका
← भजनांकडे परत

आमुचे जीवन हे कथाअमृत्त । अणिक ही संतसमागम

amuche jivan he kathaamrutta | anik hi santasamagam

रचनाकार: संत तुकाराम · अभंग
आमुचे जीवन हे कथाअमृत्त । अणिक ही संतसमागम ॥१॥ सारूं एके ठायीं भोजन परवडी । स्वादरसे गोडी पदोपदीं ॥ध्रु.॥ धालिया ढेकरे येती आनंदाचे । वोसंडले वाचे प्रमेसुख ॥२॥ पिकले स्वरूप आलया घुमरि । रासी ते अंबरीं न समाये ॥३॥ मोजितां तयाचा अंत नाहीं पार । खुंटला व्यापार तुका म्हणे ॥४॥