भजनी मालिका
← भजनांकडे परत

अमित सूर्य प्रकाशले तेज उदयो जाहाले

amit surya prakashale tej udayo jahale

अमित सूर्य प्रकाशले तेज उदयो जाहाले । ज्ञानज्योति फ़ांकले दुणावोनि वो माय ॥१॥ दामोदर नामें मना बांधिलें दावें । निरंजन म्हणावे आपणा वो माय ॥२॥ गुणचि नाहीं त्यासी काय लाऊं गुण । अतीत निरंजन देखिला वो माय ॥३॥ डोळा जरी पाहीं तरि पारु न कळे खेवोवो माय ॥४॥ आतां असे हव्यासु लागला निजध्यासु । निरंजनीं सौरसु करीतसे वो माय ॥५॥ आतां आहे तैसा असो माझ्या ह्रदयींच वसो । हा रखुमादेविवरु विठ्ठलु वो माय ॥६॥