भजनी मालिका
← भजनांकडे परत

आम्ही विठ्ठलाचे दास झालों आतां । न चलेचि सत्ता आणिकांची

amhi viththalache das jhalon atan | na chalechi satta anikanchi

रचनाकार: संत तुकाराम · अभंग
आम्ही विठ्ठलाचे दास झालों आतां । न चलेचि सत्ता आणिकांची ॥१॥ नावरे तयासी ऐसें नाहीं दुजें । करितां पंढरिराजें काय नव्हे ॥ध्रु.॥ कोठें तुज ठाव घ्यावयासी धांवा । मना तूं विसावा घेईं आतां ॥२॥ इंद्रियांची वोढी मोडिला व्यापार । ज्या अंगें संचार चाली तुज ॥३॥ तुका म्हणे आम्ही जिंकोनियां काळ । बैसलों निश्चळि होऊनियां ॥४॥