भजनी मालिका
← भजनांकडे परत

आम्ही तेणें सुखी । म्हणा विठ्ठल विठ्ठल मखीं

amhi tenen sukhi | mhana viththal viththal makhin

रचनाकार: संत तुकाराम · अभंग
आम्ही तेणें सुखी । म्हणा विठ्ठल विठ्ठल मखीं ॥१॥ तुमचें येर वित्त धन । ते मज मृत्तिकेसमान ॥ध्रु.॥ कंठीं मिरावा तुळसी । व्रत करा एकादशी ॥२॥ म्हणवा हरीचे दास । तुका म्हणे मज हे आस ॥३॥