भजनी मालिका
← भजनांकडे परत

आम्ही पाहा कैसीं एकतत्त्व झालों । राखणे लागलों वासनेसी

amhi paha kaisin ekatattva jhalon | rakhane lagalon vasanesi

रचनाकार: संत तुकाराम · अभंग
आम्ही पाहा कैसीं एकतत्त्व झालों । राखणे लागलों वासनेसी ॥१॥ तुम्हांविण कांहीं नावडावें या जीवा । केला तोचि देवा दृढ पण ॥ध्रु.॥ वर्म नेणों परि वृत्ती भंगों नेदुं । वंदिलें चि वंदूं आवडीनें ॥२॥ तुका म्हणे कले नामाचें जीवन । वारता ही भिन्न नेणों आतां ॥३॥