भजनी मालिका
← भजनांकडे परत

आम्ही जातों तुम्ही कृपा असों द्यावी । सकळा सांगावी विनंती माझी

amhi jaton tumhi krupa ason dyavi | sakala sangavi vinanti majhi

रचनाकार: संत तुकाराम · अभंग
आम्ही जातों तुम्ही कृपा असों द्यावी । सकळा सांगावी विनंती माझी ॥१॥ वाडवेळ झाला उभा पांडुरंग । वैकुंठा श्रीरंग बोलावितो ॥२॥ अंतकाळीं विठो आम्हांसी पावला । कुडीसहित झाला गुप्त तुका ॥३॥