भजनी मालिका
← भजनांकडे परत

आम्ही जाणों तुझा भाव । कैचा भक्त कैचा देव । बीजा नाहीं ठाव । कैचे फळ शेवटीं

amhi janon tujha bhav | kaicha bhakta kaicha dev | bija nahin thav | kaiche phal shevatin

रचनाकार: संत तुकाराम · अभंग
आम्ही जाणों तुझा भाव । कैचा भक्त कैचा देव । बीजा नाहीं ठाव । कैचे फळ शेवटीं ॥१॥ संपादिले बहु रूप । कैचे पुण्य कैचे पाप । नव्हतों आम्ही आप । आपणासी देखिले ॥ध्रु.॥ एके ठायीं घरच्याघरीं । न कळतां झाली चोरी । तेथे तेचि दुरी । जाणे याणे खुटंले ॥२॥ तुका म्हणे धरुनि हातीं । उरी ठेविली मागुती । एकांतीं लोकांतीं । देव भक्त सोहळा ॥३॥