भजनी मालिका
← भजनांकडे परत

आम्ही जाणों तुझा भाव । दृढ धरियेले पाव

amhi janon tujha bhav | drudh dhariyele pav

रचनाकार: संत तुकाराम · अभंग
आम्ही जाणों तुझा भाव । दृढ धरियेले पाव ॥१॥ फांकुं नेदूं चुकावितां । नेघों थोडें बहु देतां ॥ध्रु.॥ बहुता दिसाचें लिगाड । आलें होत होत जड ॥२॥ तुका म्हणे आतां । नेघो सर्वस्व ही देतां ॥३॥