भजनी मालिका
← भजनांकडे परत

आम्हां न कळे ज्ञान न कळे पुराण । वेदांचे वचन न कळे आम्हां

amhan na kale dnyan na kale puran | vedanche vachan na kale amhan

रचनाकार: संत चोखोबा · अभंग
आम्हां न कळे ज्ञान न कळे पुराण । वेदांचे वचन न कळे आम्हां ॥१॥ आगमाची आठी निगमाचा भेद । शास्त्रांचा संवाद न कळे आम्हां ॥२॥ योग याग तप अष्टांग साधन । न कळेची दान व्रत तप ॥३॥ चोखा म्हणे माझा भोळा भाव देवा । गाईन केशवा नाम तुझें ॥४॥